Karnataka Election 2023 : भाजपचा दारुण पराभव होत आहे; हा २०२४ साठी शुभ शकून : संजय राऊत
पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाची कर्नाटकातील विधानसभेची निवडणूक केवळ कर्नाटकाच्यादृष्टीने नसून देशाच्यादृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीनंतर लागलीच राजस्थान, छत्तीसगड व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. आज कर्नाटकमध्ये विधानसभा जागेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी "हा २०२४ साठी शुभ शकुन" असं सुचक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. वाचा संजय राऊत काय म्हणाले ते…(Karnataka Election 2023)
Karnataka Election 2023 : महाराष्ट्राशी ही गद्दारीच
खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, " आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे. हा २०२४ साठी शुभ शकुन आहे."
पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असही म्हंटल आहे की," दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे. मराठी माणूस हे लक्षात ठेवील. जय महाराष्ट्र!
हेही वाचा
- Karnataka Election 2023 Live : कर्नाटकात मतदानाला सुरुवात; 224 विधानसभा जागांसाठी मतदान
- Karnataka Election 2023 : भाजपचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी अजिबात संबंध नव्हता; राऊतांचा भाजपवर निशाणा
- शरद पवार 'ॲक्शन मोड'वर, कर्नाटकात ४० जागा लढवणार, भाजपचे ४-५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात?
- चला मतदानाला, आमदार निवडायला! कर्नाटकात आज मतदान

