Karnataka election 2023 | शरद पवार ‘ॲक्शन मोड’वर, कर्नाटकात ४० जागा लढवणार, भाजपचे ४-५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात? | पुढारी

Karnataka election 2023 | शरद पवार 'ॲक्शन मोड'वर, कर्नाटकात ४० जागा लढवणार, भाजपचे ४-५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शरद पवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली. याच दरम्यान कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरी आर यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कर्नाटकातील निवडणुकीत आम्ही किमान ४० जागांवर लढणार आहोत. तसेच सत्ताधारी भाजपचे ४-५ विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी आमच्या संपर्कात आहेत. बंगळूरचे माजी महापौरही लवकरच आमच्या पक्षात दाखल होऊ शकतात, असे हरी आर यांनी म्हटले आहे. (Karnataka election 2023)

विधानसभेच्या २२४ जागा असलेल्या कर्नाटकात सत्ताधारी भाजपचे ११९ आमदार आहेत, तर काँग्रेसकडे ७५ आणि त्याचा मित्रपक्ष JD(S) चे २८ आमदार आहेत. कर्नाटकात सध्या विविध मुद्यांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच दरम्यान, शरद पवार यांनी आज शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किती जागा लढवणार यावर या बैठकीत शरद पवार यांनी चर्चा केल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ४० ते ४५ उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देण्याची तयारी आहे. २०१८ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटकात १४ जागा लढवल्या होत्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांची एकजूट निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पवार यांनी १३ एप्रिल रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता राष्ट्रवादी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला. प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीबरोबरच तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील समाप्त झाला आहे. दरम्यान, आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला आहे. (Karnataka election 2023)

 हे ही वाचा :

Back to top button
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण? Mouni Roy Birthday: तू माझं आयुष्य बदललं, दिशा पटानीच्या मौनीला अशाही शुभेच्छा टाईम बेबीसाठी रिताभरी चक्रवर्तीचा खास लूक Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी Prajakta Mali : ठरलं तर मग; Beautiful प्राजू ‘तीन अडकून सीताराम’ च्या प्रेमात सारं काही पोटासाठी ! गौतमीच्या या व्हायरल फोटोंची होते आहे चर्चा या सणांना Claasy दिसायचं आहे ? मानुषी छिल्लरचा हा लूक जरूर ट्राय करा Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज Saie Tamhankar : लाख सुंदर असतील पण तू लाखात एक आहेस सई पुलकित सम्राटच्या फॅशन स्टेटमेंटची चर्चा
Rachin Ravindra : इंग्लिश गोलंदाजीची पिसे काढणारा रचिन रविंद्र आहे तरी कोण?