Sharad Pawar : राजीनामानाट्याने शरद पवारांची पकड मजबूत | पुढारी

Sharad Pawar : राजीनामानाट्याने शरद पवारांची पकड मजबूत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले चार दिवस शरद पवारांच्या राजीनाम्याने सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. त्यांनी ही खेळी खेळून वयाच्या ८३ व्या वर्षी पक्षावरील आपला खुंटा बळकट केल्याची चर्चा आहे.

शरद पवार यांच्या या खेळीमागे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या नेत्यांचा परस्पर बंदोबस्त झाला आहे. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही पवारांची प्रतिमा उजळून निघाली असून या प्रतिमेच्या जोरावर पवार आता भाजप विरोधी पक्षाच्या आघाडीत आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करतील.

गेले काही दिवस अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार आणि भाजपला जाऊन मिळणार अशी जोरदार चर्चा होती. त्याला सत्ताधारी पक्षच नाहीतर विरोधी पक्षातील संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदारही दुजोरा देत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार हेच नव्हे तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे काही नेतेही भाजपसोबत जाण्यासाठी अनुकूल असल्याची चर्चा होती. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर अवघा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. त्यामुळे आता बंडखोरी करणाऱ्यांना दहादा विचार करावा लागणार आहे.

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना राहुल गांधी, नितीश कुमार यांच्यासह देशभरातील समविचारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी फोन करून भाजप विरोधी आघाडीसाठी तुम्ही सक्रिय असणे आवश्यक असल्याची विनंती केली. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार नसतील तर भाजप विरोधी आघाडी कमकुवत ठरेल, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : 

Back to top button