…बैठकीला मला बोलवण्याची पक्षाला गरज वाटली नसेल : जयंत पाटील | पुढारी

...बैठकीला मला बोलवण्याची पक्षाला गरज वाटली नसेल : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष शरद पवारांनी निवृत्तीची घाेषणा केल्‍यानंतर राज्‍याच्‍या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आज(दि.०३)  पुढील अध्यक्ष कोण याबाबत यशंवतराव चव्हाण सेंटर येथे ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बोलवण्यात आले नव्हते. यावर बैठकीला मला बोलवण्याची पक्षाला गरज वाटली नसेल, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्‍ट्रवादी कााँग्रेसची आज झालेली बैठक राष्ट्रीय स्तरावरची बैठक असल्याने मला बोलण्याची आवश्यकता पक्षाला वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण हजर असलेच पाहिजे याची काही आवश्यकता नाही. पक्षातील वरिष्ठ, महत्त्वाचे अधिकारी बसून यावर निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मी माझा निर्णय कालच सांगितला आहे. पक्षाच्या अनेक जिल्हाअध्यक्षांनी मला व्हॉट्स ॲपवर राजीनामा पाठवला आहे आणि अजून पाठवत आहेत. पवार साहेबांच्याकडे बघून आम्ही या पक्षात आलो. या निर्णयामुळे पक्षावर माझी कोणतीही नारीजी नाही आणि पक्ष देखील माझ्यावर नाराज नसल्याचे ते यावेळी म्हणाले. आव्हाडांचा राजीनामा मी अद्याप पाहिलेला नसून, मी यावर काही बोलू शकत नल्याचे देखील पाटील म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button