पुढारी ऑनलाईन डेस्क : मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत आहे, अशी घाेषणा शरद पवार मंगळवारी केली. या घाेषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी "साहेब राजीनामा मागे घ्या" असं भावनिक आवाहन केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही, 'साहेब तुम्हाला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.' असं भावनिक ट्विट केलं होत. आज (दि.३) आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी 'खरी लोकशाही' म्हणतं एक सुचक ट्विट केलं आहे. (Jitendra Awhad Tweet)