वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, ओपीडी केली बंद | पुढारी

वरळीच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू, ओपीडी केली बंद

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : वरळी येथील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात BAMS तृतीय वर्षात शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे (वय 22) या विद्यार्थ्याचा रात्री साडे 10 च्या दरम्यान आंबे काढायला झाडावर गेला असताना झाडावरून खाली पडून मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, रात्री 10च्या दरम्‍यान दयानंद काळे हा आंबे काढण्यासाठी झाडावर चढला होता. अचानक तो झाडावरून खाली पडला. यावेळी त्‍याच्या जबर डोक्याला मार लागला. डोक्‍याला मार लागल्‍याने त्‍याचा जागीच मृत्‍यु झाला.

या विद्यार्थाला तात्‍काळ उपराचाराची गरज असताना रुग्णालयात तत्परता दाखवली नसल्याने जीव गमवावा लागला. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला तसेच विद्यार्थांनी याचा जाबही विचारला. यानंतर संतापलेल्‍या विद्यार्थ्यांनी रुग्णालय ओपीडी बंद केली.

.हेही वाचा 

नाशिक : वृद्ध महिलेला मृत दाखवून जमीन लाटली ; न्यायालयाकडून ठकसेनला दणका 

पुण्यात एकतर्फी प्रेमातून दुचाकी पेटवणार्‍या दोघांना पोलिसांकडून अटक 

पुणे : सिगारेट बॉक्स चोरी करणारी टोळी जेरबंद

Back to top button