भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण  मिळतय : संजय राऊत  | पुढारी

भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण  मिळतय : संजय राऊत 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भीमा -पाटस साखर कारखाना  ५०० कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरण मी सीबीआयकडे पाठवले आहे. या कारखान्‍यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या तक्रारीकडे डोळेझाक केली आहे, मी सीबीआयचे दरवाजे ठोठावले आहेत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्‍यमांना दिली.

संजय राऊत : विरोधकांवर कारवाई होते पण…

विरोधकांवर कारवाई होते; पण सत्ताधाऱ्यांवर कधीच कारवाई होत नाही. उलट भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळत आहे, असा आरोप करत संजय राऊत म्हणाले,  भीमा-पाटस साखर कारखान्‍यातील  ५०० कोटींच्या मनी लॉंड्रींग प्रकरणी मी सीबीआयकडे पाठवले आहे. बुधवारी मी भीमा-पाटस परिसरात सभा घेणार आहे. कृषी मंत्री  दादा भुसे यांच्या  गिरणा सहकारी कारखान्यातही भ्रष्टाचार झाला आहे, असेही ते म्‍हणाले

बारसू-सोलगावमधील सर्वेक्षणाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे. यावेळी स्थानिक  महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांच्या गाड्या अडवल्या. पोलिसांनी काहींना अटकही केली. यावर बोलत असताना राऊत म्हणाले, बारसुत सामुदायिक हत्याकांड होवू शकत. अनेकजणांना पोलिस धमकी देत आहेत. 

हेही वाचा 

Back to top button