सत्कर्माने कीर्ती मिळत असते : रामदासी, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अन्नदान व गोशाळेस आर्थिक मदत | पुढारी

सत्कर्माने कीर्ती मिळत असते : रामदासी, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून अन्नदान व गोशाळेस आर्थिक मदत

नगर, पुढारी वृत्तसेवा: सत्कर्माने कीर्ती मिळत असते. अध्यात्मिक व धार्मिकतेचे कार्य महान आहे. जगताप कुटुंबिय वारकरी संप्रदायातील आहेत जगताप कुटुंबियांचा धार्मिकतेचा वारसा आमदार संग्राम जगताप अविरतपणे चालवित आहेत, असे प्रतिपादन समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांनी केले.

बुरूडगाव रसस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे सुरु असलेल्या श्री भागवत कथेतील अन्नदान व गोशाळेच्या कार्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी गोविंद महाराज जाटदेवळेकर व मंदारबुवा रामदासी यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, किरण पिसोरे, अभिजित खोसे, सुरेश बनसोडे, अशोक बाबर, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

रामदासी म्हणाले, साधू संतांच्या व धर्माच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कार्य करतो, तो खरा राज्यकर्ता. आपल्या जीवनाचे सार्थक होण्यासाठी संतांच्या विचारांची खरी गरज आहे. आपल्याकडून समाजात जे सद्कार्य होते, ते आपल्या आयुष्याच्या वाटचालीत कामाला येते. त्यामुळे प्रत्येकाने अध्यात्मिक आणि धार्मिकतेचा वारसा अखंडित चालू ठेवावा. श्रीमद भागवत ग्रंथामधील आनंद हा कुठेही मिळत नाही. त्यामुळे सर्वांनी भागवत कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री भागवत कथेत आमदार जगताप यांच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button