Maruti Suzuki Fronx SUV : मारुती सुझुकीची नवी एसयुव्ही कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स | पुढारी

Maruti Suzuki Fronx SUV : मारुती सुझुकीची नवी एसयुव्ही कार भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki ने सोमवारी अधिकृतपणे आपली नवीन एसयुव्ही लॉन्च केली. Fronx असे या नव्या SUV कारचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या नव्या कारची चर्चा जोरदार होती. त्यामुळे ही कार ग्राहकांसाठी खुशखबर असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने ही नवी एसयुव्ही कार लॉन्च करण्याबाबतची माहिती दिली होती. कारचे चाहते देखील फ्रॉन्क्सच्या लाँचिगची आतुरतेने वाट पाहत होते. याआधीच नेक्सा या अधिकृत डिलरशीपकडे ही एसयुव्ही कार उपलब्ध करुन दिली आहे. एप्रिलमध्ये (२०२३) या कार लॉन्च केल्या जाऊ शकतात.

जानेवारीमध्ये झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात फ्रॉन्क्स या एसयुव्हीची पहिली झलक पहायला मिळाली होती. अल्पावधीतच या कारचे बुकींग मोठ्या प्रमाणात झाले. कंपनीच्या वेबसाईट आणि डिलरमार्फत बुकिंग करण्याची सुविधा देखील कंपनीने याआधीच उपल्बध दिली होती. (Maruti Suzuki Fronx SUV)

फ्रॉन्क्सची बेसिक किंमत

भारतात या कारच्या बेसिक मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ७.४६ लाख इतकी असणार आहे. तसेच कारच्या अल्फा ड्युअल टोन या टॉप मॉडेलची किंमत १३.१३ लाख इतकी असेल. या नव्या SUV कारमुळे मारुती सुझुकीचा पोर्टफोलिओ वाढण्यास मदत होणार आहे.

मॉडेल आणि इंजिन पॉवर

हे नवे मॉडेल लाइनअप ५ प्रकारांमध्ये पहायला मिळेल. सिग्मा, डेल्टा, डेल्टा+, झेटा आणि अल्फा असे हे पाच प्रकार असणार आहेत. पेट्रोल इंजिन बाबत बोलायचे झाले तर, 1.0L टर्बो आणि 1.2L नॅचरल एस्पिरेटेड असे दोन पर्याय यामध्ये उपलब्ध असणार आहेत. याचे टर्बो इंजिन 98.6bhp इतकी पॉवर आणि 147.6Nm इतका टॉर्क जनरेट करते. तसेच ग्राहकांकडे तीन गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध असणार आहेत. 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 5-स्पीड AMT असे हे गिअरबॉक्स पर्याय असणार आहेत.

फिचर्स

सिग्मा व्हेरियंटमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, व्हील कव्हर्ससह स्टील व्हील, कीलेस एंट्री अँड गो, ड्युअल-टोन इंटिरियर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री, स्टीयरिंगसाठी टिल्ट अॅडजस्टमेंट, पॉवर्ड विंडो, सीट स्प्लिट, अशा काही विशेष फिचर यामध्ये आहेत. तसेच होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स आणि रिअर डीफॉगर यांसारख्या फिचर्सनी ही कार सुसज्ज असेल.

हेही वाचा

Back to top button