नारायण राणे यांच्या विरोधात संजय राऊतांनी केला अब्रुनुकसानीचा दावा

नारायण राणे यांच्या विरोधात संजय राऊतांनी केला अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई पुढारी वृत्तसेवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मी शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, अशी विधाने नारायण राणे यांनी भांडुप येथे आयोजित एका कार्यक्रमात केली होती.

संजय राऊत यांनी याप्रकरणी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती. नारायण राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचे दावे सिद्ध करावेत, असे नोटीसीत म्हटले होते. मात्र, नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी त्यांना आता आपल्या मानहानी प्रकरणी न्यायालयात खेचले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news