Cyber Crime : मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक - पुढारी

Cyber Crime : मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अधिकृत ईमेल आयडीवरून terrorist behind jk attack gunned down in mumbai अशा आशयाचा मेल राज्यभरात जात असून याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राज्य सायबर विभागाने तपास सुरु केला असून या ईमेल आयडीवरुन आलेले मेल न उघडण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. (Cyber Crime : Email ID of East Cyber Division of Mumbai Police hacked)

Cyber Crime : Email ID of East Cyber Division of Mumbai Police hacked
Cyber Crime : Email ID of East Cyber Division of Mumbai Police hacked

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या पूर्व सायबर विभागाच्या अधिकृत ईमेल आयडीवरुन विविध शासकीय ईमेल आयडीवर terrorist behind jk attack gunned down in mumbai अशा आशयाचे मेल मंगळवारी जाऊ लागले. पाठवलेल्या ईमेलसोबत एक इंटेलिजन्स रीपोर्ट नावाने पीडीएफ फाईलही जोडली जात आहे. याची माहिती मिळताच राज्य सायबर विभागाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. ( Cyber Crime )

राज्य सायबर विभागाने एक पत्रक जारी करत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना असा मेल आल्यास उघडू नये अशा सूचना दिल्या आहेत. तसेच ईमेलसोबत आलेली इंटेलिजन्स रिपोर्ट नावाची पीडीएफ फाईलही ओपन करु नये. ही फाईल ओपन केल्यास डेटा चोरी होऊ शकतो अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Back to top button