पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार ४० आमदारांसह भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहीच पत्र देखील त्यांच्याकडे असल्याच चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवार भाजपसोबत येत असतील तर ही गोड बातमी आहे, ते राष्ट्रवादीत थांबणार नाहीत. पण पुढील ५ वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा त्यांनी केला आहे.
मंत्री सत्तार म्हणाले की, "राज्यात सध्या सुरू असलेल्या परिस्थितीची कारणे आणि खरी माहीती या विषयाचे नेते शरद पवार यांनाच माहित आहे. अजित पवार आता राष्ट्रवादीत थांबणार नाहीत. ते सरकारसोबत येत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. पण पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील. मुख्यमंत्री शिंदे यांची जी भूमिका असेल ती आम्हाला मान्य आहे. सर्व पक्ष त्यांच्या मागे आहे. ते ४० आमदारांचा विचार करून निर्णय घेतील, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :