Sanjay Raut : राष्ट्रवादीत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू – संजय राऊत | पुढारी

Sanjay Raut : राष्ट्रवादीत फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू - संजय राऊत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sanjay Raut : अजित पवार हे महाविकास आघाडीतील एक प्रमुख नेते असून ते मविआचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार किंवा अजित पवार नॉटरिचेबल, अजित पवार यांचे मौन, आदी सर्व गोष्टी फक्त अफवा आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. ते म्हणाले, आम्ही सर्वजण फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहोत. स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे आम्ही सर्व प्रमुख नेत्यांनी चर्चा केली आहे. तसेच अजित पवार मविआचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार किंवा मविआतून बाहेर पडणार या सर्व चर्चा निरर्थक आहेत. यात काहीही तथ्य नाही. या फक्त अफवा आहेत, असे राऊत यांनी पुन्हा पुन्हा सांगितले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असा देखील आरोप यावेळी राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : महाविकास आघाडीचा भाजपला धसका

भाजपने महाविकास आघाडीचा धसका घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील, हा माझा विश्वास आहे. सध्या केंद्र सरकार दबाव टाकून निर्णयावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मात्र, माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! धनंजय मुंडे नॉट रिचेबल, मुंडे बंधू-भगिनींचे झाले एकमत

COVID-19 Update: कोरोना रूग्णसंख्येत घट; २४ तासांत ७,६३३ रूग्णांची नोंद

Back to top button