Stock Market Opening | सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला, ‘हे’ शेअर्स तेजीत | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ४०० अंकांनी वाढला, 'हे' शेअर्स तेजीत

Stock Market Opening : मार्च तिमाहीतील कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भारतीय शेअर्सनी तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३९९ अंकांनी वाढून ६०,२४६ वर पोहोचला. तर निफ्टी ११३ अंकांच्या वाढीसह १७,७३७ वर होता.

सेन्सेक्सवर कोटक महिंद्रा बँक, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ ते ४ टक्क्यांनी वाढले. नेस्ले, एसबीआय, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि टाटा स्टील हेदेखील वधारुन खुले झाले आहेत. टीसीएस, एशियन पेंट्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरले आहेत.

बँक ऑफ बडोदाचे शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास ४ टक्के वाढले. कारण मार्च २०२३ ला संपलेल्या तिमाहीत बँक ऑफ बडोदाच्या उलाढालीत वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button