Tax Refund : इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर करदात्यांना कर परताव्याची (टॅक्स रिफंड) प्रतीक्षा असते. अधिक कर भरला असेल तर परतावा मिळण्यासाठी दावा करता येतो. आयटीआर दाखल केल्यानंतर आयकर विभागाला हा दावा योग्य वाटत असेल तर त्याची माहिती तुम्हाला एसएमएस आणि ई-मेलद्वारे पाठवली जाते.
आयकर विभागाकडून आलेल्या मॅसेजमध्ये आयकर विभाग तुमच्या खात्यात किती रक्कम परत केली जाईल हे सांगतो. यासोबतच रिफंडचा क्रमांकही पाठवण्यात येतो.
प्राप्तिकर रिफंडचे स्टेटस पाहण्याच्या दोन पद्धती आहेत.
1. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर,
2. टिन 'एनएसडीएल'च्या संकेतस्थळावर.
सर्वात अगोदर प्राप्तिकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जाणे.
पॅन, पासवर्ड, कॅप्चा कोड यासारखे विवरण भरून अकाऊंट लॉग-इन करणे.
रिव्हू रिटर्न्स/फॉर्म्सवर क्लिक करणे.
ड्रॉप डाऊन मेन्यूत इन्कमटॅक्स रिटर्न्स निवडा. यात ज्या आर्थिक वर्षाचे (असेसमेंट इअर) रिफंड तपासायचे आहे, ते वर्ष निवडा.
यानंतर एक्नॉलेजमेंट नंबर म्हणजेच हायपर लिंकवर क्लिक करा. एक पॉपअप आपल्या स्क्रिनवर दिसेल. तो रिटर्नच्या फायलिंगचे टाइमलाईन दाखवेल. उदा. आयटीआर कधी भरला, कधी व्हेरिफाय झाला, प्रोसेसिंगची तारीख आणि रिफंड इश्यूची तारीख आदी. याशिवाय असेसमेंट इअर, स्टेटस, फॉर्म सबमिट न झाल्याचे कारण आणि पेमेंटचे माध्यमही दाखवेल.
प्राप्तिकर विभागाच्या रिफंड स्टेटसला टिन-एनएसडीएलच्या संकेतस्थळावरदेखील तपासू शकता. प्राप्तिकर विभागाकडून रिफंड पाठवल्यानंतर दहा दिवसांनी एनएसडीएलच्या संकेतस्थळावर त्याचे स्टेटस येते. पुढीलप्रमाणे प्राप्तिकर विभागाच्या रिफंडचे स्टेटस पाहू शकता.
सर्वात अगोदर https://tin.tin.nsdl. com/oltas/refundstatuslogin.html वर जाणे व पॅन नंबर टाकणे.
ज्या वर्षाचे रिफंड पाहायचे असेल, त्या वर्षाची निवड करणे.
कॅप्चा कोट टाकून क्लिक करा. रिफंडच्या स्टेटसच्या आधारावर स्क्रिनवर रिफंडचा मेसेज दिसेल.
रिफंड री-इश्यू रिक्वेस्ट पाठवा.
जर एखाद्या चुकीने अर्ज दाखल झाला नाही, तर पुन्हा रिक्वेस्ट देण्याची आवश्यकता आहे.
अगोदर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाणे.
माय 'अकाऊंट टॅब'वर क्लिक करा. त्यानंतर सर्व्हिस रिक्वेस्टचा पर्याय निवडावा.
न्यू रिक्वेस्टमध्ये मागणीचा प्रकार निवडा. रिक्वेस्ट श्रेणीत रिफंड री-इश्यूची निवड करा.
पॅन, रिटर्नचा प्रकार, असेसमेंट इअर, अॅकनॉलेजमेंट नंबर, कम्युनिकेशन रेफरन्स नंबर आणि रिस्पॉन्ससारखे विवरण स्क्रिनवर दिसेल.
'सबमीट'वर क्लिक करा.
आपले खाते आणि राहण्याचा पत्ता शेअर करा.
इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड (ईव्हीसी) किंवा डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डीएससी)च्या माध्यमातून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पार पाडावी लागेल.
– श्रीकांत देवळे