अखेर हिमालय पूल नागरिकांच्या सेवेत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार वर्षापासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील हिमालय पादचारी पूल आज पासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. त्यामुळे तब्बल चार वर्ष जीव मुठीत घेऊन, डी. एन. रोड ओलांडणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी डी. एन. रोडवर असलेला हिमालय पादचारी पूल १४ मार्च २०१९ मध्ये सायंकाळी अचानक कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० जण जखमी झाले होते. या पुलाचे काम दोन आठवड्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, अशी महापालिका प्रशासनाची इच्छा होती. पण पूलाच्या लोकार्पणाची प्रतिक्षा न करता नागरिकांसाठी तो खुला करावा, असे निर्देश थेट राज्य सरकारकडून आल्यामुळे पालिकेने हा पुल गुरुवारी नागरिकांसाठी तातडीने खुला केला आहे.
हेही वाचा :
- गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार का?
- केंद्र, राज्य सरकारकडून शेतकर्यांची फसवणूक
- राहुल गांधी ‘खासदारकी रद्द’ प्रकरणी जर्मनीच्या टिप्पणीवरुन काँग्रेस-भाजप आमने-सामने