

Gold Price Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आज वाहने, सोने-चांदी, स्थावर मालमत्ता, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, आज बुधवारी (दि.२२) शुद्ध सोन्याच्या दरात ५७४ रुपयांची घट झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुद्ध सोन्याचा दर आज प्रति १० ग्रॅम ५८,६१४ रुपयांवर खुला झाला आहे. हा दर काल मंगळवारी प्रति १० ग्रॅम ५९,१८८ रुपयांवर होता. तर गेल्या सोमवारी सोन्याने ६० हजारांचा टप्पा पार केला होता. पण गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५८,६१४ रुपये, २३ कॅरेट ५८,३७९ रुपये, २२ कॅरेट ५३,६९० रुपये, १८ कॅरेट ४३,९६१ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३४,२८९ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ६८,२५० रुपयांवर आहे.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या व्याजदर घोषणेपूर्वी गुंतवणूकदार चिंतित आहे. परिणामी बुधवारी सोन्याच्या किमती घसरल्या. आज सुरुवातीच्या व्यवहारात MCX वर एप्रिल सोने फ्युचर्स प्रति १० ग्रॅम ५८,५९९ रुपयांवर व्यवहार करत होते. ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२०० रुपयांवर होते. पण त्याने गेल्या सोमवारी ६० हजारांचा पार करत उच्चांकी पातळी गाठली. आता त्यात घट होताना दिसत आहे. (Gold Price Today)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :