

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण मुंबईतील कार्यकर्त्यांना सोमवारी दुपारी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी निषेध आंदोलन करण्यास मज्जाव केला. भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बलार्ड इस्टेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयावर जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांना आझाद मैदानावर नेले. भाजयुवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. (MLA Jitendra Awad)
जितेंद्र आव्हाड हे हिंदुत्व आणि सनातन संस्कृतीवर सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी काल सनातन धर्मावर वक्तव्य केले होते. भाजयुवा मोर्चा मुंबई या अपमानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी कार्यकर्ते फोर्ट येथील वालचंद हिराचंद मार्ग येथे एकत्र जमले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हा परिसर दुमदुमून सोडला. यानंतर सर्व आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्या हातातील फलक घेतले व ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये नेले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वातावरण शांत झाले.
हेही वाचा