अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; राजीनामा देण्याची मागणी | पुढारी

अब्दुल सत्तार यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; राजीनामा देण्याची मागणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची हकालपट्टी करा… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी बोलाचिच भात जेवोनिया तृप्त कोण झाला… यंदाचा अर्थसंकल्प वाया गेला… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button