Hasan Mushrif | हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, दोन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देश | पुढारी

Hasan Mushrif | हसन मुश्रीफ यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा, दोन आठवडे कारवाई न करण्याचे निर्देश

मुंबई : पुढारी ऑनलाईन; राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा आहे. मुश्रीफ यांच्यावर दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचेही निर्देश न्यायालयाने दिल्याने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. हसन मुश्रीफ यांनी ईडीने समन्स बजावले आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाई विरोधात मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांवरून झालेल्या तक्रारीनंतर मुश्रीफ यांची ईडीने चौकशी केली. ११ जानेवारी व ११ मार्च रोजी त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. ११ जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह अन्य अधिकार्‍यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते. बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्‍या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button