#munmun dhamecha : ‘मी आर्यन खानला ओळखत नाही’ | पुढारी

#munmun dhamecha : ‘मी आर्यन खानला ओळखत नाही’

मुंबई, पुढारी ऑनलाईन :

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक केलेल्या मूनमून धमेचा #munmun dhamecha हिने शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज सेठ मर्चंट यांना ओळखत नसल्याचे कोर्टात सांगितले आहे. या तिघांनाही ७ ऑक्टोंबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठविले आहे.

एनसीबीने मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या कार्डेलिया या क्रूझवर छापा टाकून शाहरूख खानच्या मुलासह अन्य दोघांना अटक केली होती. यात उद्योगपतीची मुलगी असलेल्या मूनमून धमेचा हिलाही अटक केली होती. ही मूनमून धामेचा कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तिची आणि शाहरूखचा मुलगा आर्यन आणि त्याचा मित्र अरबाज याच्याशी तिचा संपर्क होता का याचा तपास सुरू आहे. ती नेमकी पार्टीत कशी आली याचा तपासही केला जात आहे. याबाबत मूनमूनचे वकील अनिल सिंह यांनी कोर्टात स्पष्टीकरण दिले आहे.

‘ मूनमून ही मॉडेल असून ती अँकरही आहे. ती कोरोना काळात तिच्या मध्यप्रदेशातील सागर या गावी राहिली आहे. काही दिवसांपूर्वी ती कामासाठी मुंबईत आली होती. तिला क्रूझवरील पार्टीच्या आयोजकांनी आमंत्रित केले होते. ’ असे सांगण्यात आले. तसेच .ती ड्रग्ज घेत नाही. तिचा तसा कोणताही पूर्वइतिहास नाही,असा दावाही वकील सिंह यांनी कोर्टात केला. मात्र, तिच्याकडे ५ ग्रॅम ड्रग्ज मिळाल्याचा दावा एनसीबीने केला होता.

एनसीबीचे दोन छापे ( #munmun dhamecha )

ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुखचा मुलगा आर्यनसह आठ जणांना अटक केल्यानंतर परवानगीसह गोव्याकडे रवाना झालेली कॉर्डेलिया द एम्प्रेस क्रूझ सोमवारी मुंबईकिनारी परतली आणि एनसीबीचे पथक तिची वाटच पाहात होते. ही क्रूझ किनार्‍याला लागताच एनसीबीने छापा टाकला आणि अटक केलेल्या आरोपींच्या खोल्यांची झडती घेत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हस्तगत केले.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून शनिवारी कॉर्डेलिया गोव्याकडे निघाली तेव्हा जहाजावर 1800 प्रवासी होते. एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना अटक केल्यानंतर क्रूझला पुढे जाण्याची परवानगी दिली. मात्र, 200 प्रवाशांनी आपला दौरा रद्द केला. उर्वरित प्रवाशांसह ही क्रूझ मग गोव्यापर्यंत जाऊन आली. या प्रवाशांमध्ये बहुतांश उत्तर भारतातील प्रवाशांचा समावेश आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 20 अधिकार्‍यांच्या पथकाने सोमवारी सकाळी क्रूझवर पुन्हा छापा टाकला. आणखी आठ जणांना अटक करताना या पथकाने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्‍त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
क्रूझवरील सर्व प्रवाशांची यादी एनसीबीने तयार केली आहे. जे प्रवासी बुकिंग असूनही जहाजावर आढळले नाहीत, त्यांना फरार घोषित करीत शोध घेतला जात आहे.

एनसीबीच्या पथकाने त्यासाठी दिल्ली, गोवा आणि बंगळूर येथेही छापा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. एनसीबीने मुंबईतील वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला येथे छापे टाकून अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. एनसीबीचे पथक ड्रग पॅडलरचा कसून शोध घेत आहे.

हेही वाचा :

Back to top button