Supreme Court Hearing Shiv Sena : राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च सुनावणी | पुढारी

Supreme Court Hearing Shiv Sena : राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना कुणाची हे उत्तर जरी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी पक्षासंदर्भातील खटला अद्याप ही सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. अशात राज्यातील सत्तासंघर्षावर मंगळवारी (दि. १४) पुन्हा सुनावणी होणार आहे.ठाकरे गटाच्या वतीने यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान युक्तिवाद करण्यात आला होता. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्या नंतर  मंगळवारी घटनापीठा समक्ष शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी आणि राज्यपालचे वकील उपस्थित राहतील आणि आपली बाजू मांडातील.
पुढील दोन दिवस ही सुनावणी चालू राहील.शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केल्यानंतर ठाकरे गटाकडून ही युक्तिवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात या महिन्यात सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण होऊन निकाल येण्याची शक्यता आहे. घटनापीठ दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर काय निकाल सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा

Back to top button