मुलाचा शिंदे गटात प्रवेश क्लेशदायक : सुभाष देसाई | पुढारी

मुलाचा शिंदे गटात प्रवेश क्लेशदायक : सुभाष देसाई

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिवसेनेत प्रवेश केला. ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी दिली.

शिवसेना, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असे देसाई म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button