सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला धक्का | पुढारी

सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला धक्का

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते (ठाकरे गट) माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी सोमवारी (दि.१३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भूषण देसाई यांच्या या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
भूषण देसाई यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे .तुमच्यासोबत काम करायचे आहे आणि काम करणाऱ्या लोकांबरोबर राहायचे आहे, असे भूषण देसाई यांनी म्हटले आहे.

राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार विकासाभिमुख निर्णय घेणारे असल्याने भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर बाळासाहेब हेच माझे दैवत आहे आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून मला दुसरे काही दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना जवळून पाहिले आहे, एकमेकांसोबत काम केले आहे.त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांचे काम पाहून मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भूषण देसाई यावेळी म्हणाले.

हेही वाचंलत का?

Back to top button