मुंबईचा पार वाढला, तापमान@ ३९.४; पुढील आठवड्यातही उष्णतेची लाट राहणार कायम | पुढारी

मुंबईचा पार वाढला, तापमान@ ३९.४; पुढील आठवड्यातही उष्णतेची लाट राहणार कायम

मुंबई; पुढारी डेस्क :  उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला असून, मुंबईत रविवारी या वर्षाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. रविवारी दुपारी सांताक्रूझ वेधशाळेत ३९.४ अंशाचे तापमान नोंद झाले. मुंबईत असणाऱ्या सामान्य तापमानापेक्षा जवळपास ७ अंशाने हे तापमान अधिक होते. दरम्यान ही उष्णतेची लाट या आठवड्यातही कायम राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या संशोधक सुषमा नायर यांच्या मते पूर्वेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांमुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून वातावरण आणखी तापत आहे. त्यामुळे गरज असेल तरच दुपारनंतर बाहेर पडा, असा सल्ला देण्यात आला आहे. तहान नसेल तरीही पुरेसे पाणी प्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच हृदयविकार, आकडी, किडनी किंवा आतड्याचा आजार असणाऱ्या लोकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे मुंबईमध्ये मार्चच्या मध्यापासून ते जूनपर्यंत उन्हाळ्याचा तीव्र हंगाम असतो. यावेळी मात्र आठवडाभर आधीच उकाडा जाणवू लागला आहे. मुंबईचे वातावरण ३० ते ३५ अंशावर जात असते. यावेळी मात्र ते ३९ पर्यंत गेले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button