H3N2 virus : एच ३ एन २ विषाणूचा धोका कुणाला ? | पुढारी

H3N2 virus : एच ३ एन २ विषाणूचा धोका कुणाला ?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  भारतात सध्या एच३एन२ इन्फ्लुएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आणि कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन नीती आयोगाने केले आहे. (H3N2 virus)

यासंदर्भात माहिती देताना मुंबईच्या युनिसॉन मेडिकेअर अॅण्ड रिसर्च सेंटरचे एचआयव्ही आणि इन्फेक्शिअस डिसिजेसचे कन्सल्टंट डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले, की एच३एन२ कोणत्या वयोगटासाठी धोकादायक आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, कोमॉर्बिटीज असणारे नागरिक, डायबेटीज, विनल प्रॉब्लेम, ट्रान्सप्लांट पेशंट, ट्युबरक्लोसिस, अस्थमा, इतर अॅलर्जी, ब्रॉन्कायटीस, क्रॉनिक पुलमोनोलॉजी डिसिज किंवा सीओपीडी यांना एच३एन२ चा जास्त धोका आहे. त्यांची काळजी
घेण्याची गरज आहे. लसीकरणाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा कवच दिले जाऊ शकते. वर्षातून एकदा व्हॅक्सिन देऊनही त्यांचा या व्हायरसपासून बचाव करता येईल.

H3N2 virus : एच३एन२ इन्फ्लुएंझा म्हणजे काय ?

एच३एन२ इन्फ्लूएंझाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने माहिती जाहीर केली आहे. इनफ्लुएंझा व्हायरस ए, बी, सी, डी अशा चार प्रकारचा असतो. यातील ए आणि बी प्रकारचे व्हायरस वातावरणात बदल झाला की पसरतात. यातील ए प्रकारच्या व्हायरसचे दोन प्रकार असतात. एच३एन२ आणि एच१एन१ असे हे प्रकार आहेत. बी प्रकारच्या इन्फ्लूएंझाचे उपप्रकार नसतात.’ सी हा प्रकार फारसा चिंताजनक नसतो. डी हा प्रकार प्राण्यांमध्ये आढळतो. १५ सप्टेंबरनंतर एच३एन२ चे रुग्ण वाढल्याचेही गिलाडा म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button