Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच ऑफर केल्याप्रकरणी तरूणीवर गुन्हा दाखल

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना १ कोटीची लाच ऑफर केल्याप्रकरणी तरूणीवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना धमकी देत, १ कोटी रूपयांची लाच ऑफर केल्याप्रकरणी तरूणीसह तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक झालेली नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

अनिक्षा नावाच्या महिला डिझायनरने आणि तिच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच ऑफर करत, धमकी दिली होती. या प्रकरणी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना आरोपींचा कॉल आणि मेसेज आल्यानंतर अमृता यांनी मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपींना शोधून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) २० फेब्रुवारीला या तरूणीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मलबार हिल पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ अंतर्गत कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ साली पहिल्यांदा भेट झाली होती. आरोपी अनिक्षाने अमृता यांना सांगितले होते की, ती कपडे आणि दागिन्यांची डिझायनर आहे. मी डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती आरोपी अनिक्षा हिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमात अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत स्पष्ट केले.

त्यानंतर पुण्यातील एका कार्यक्रमात अनिक्षा अमृता यांना भेटली. कार्यक्रम संपल्यानंतर अनिक्षाला मी कारमध्ये बसवले तेव्हा अनिक्षाने म्हटलं की, तिचे वडील पोलिसांना बुकींबाबत माहिती देत आहेत. त्यानुसार, पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो. यानंतर मी अनिक्षाला कारमधून खाली उतरवले असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपी तरूणीने यानंतर तिच्या वडिलांवर एका प्रकरणी आरोप करण्यात आले असल्याचे अमृता फडणवीस यांना सांगितले होते. याप्रकरणात त्यांना बाहेर काढण्यासाठी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपये देण्याची तयारी असल्याचे सांगत, याप्रकरणातून वडिलांना बाहेर काढण्याची विनंती अमृता यांना फोनद्वारे केली होती. यानंतर अमृता यांनी फोन कट करत तिला ब्लॉक केले. तिने पुन्हा अनोळखी नंबरवरून अमृता फडणवीस यांना व्हॉट्सअॅपवरून व्हिडिओ क्लीप, व्हॉईस नोटस पाठवले होते. त्यानंतर हा नंबर आरोपी अनिक्षा हिच्या वडिलांचा असल्याची माहिती अमृता यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news