Stock Market opening | शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला | पुढारी

Stock Market opening | शेअर बाजार सावरला, सेन्सेक्स ५०० अंकांनी वाढला

Stock Market opening : कालच्या घसरणीनंतर आज शुक्रवारी (दि.३) शेअर बाजार सावरला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी वाढून ५९,४४३ वर गेला. तर निफ्टी १६४ अंकांनी वाढून १७,४८६ वर पोहोचला. अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून येत आहे. अदानी समूहातील काही शेअर्स १० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

सुरुवातीच्या सकाळच्या व्यवहारात येस बँक, पंजाब नॅशनल बँक, व्होडाफोन आयडिया, अदानी पोर्टस, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया हे शेअर्स टॉपवर होते. (Stock Market opening)

अमेरिकेतील प्रमुख निर्देशांक वाढून बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले. जपानचा निक्केई आज ३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. निक्केई सुरुवातीच्या व्यवहारात १.४५ टक्के वाढून २७,८९८ वर गेला. टॉपिक्स निर्देशांक १.२६ टक्के वाढून २,०१९ वर होता. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ३६ पैशांनी वाढून ८२.२४ वर पोहोचला.

हे ही वाचा :

Back to top button