Stock Market Opening | सेन्सेक्स घसरला, अदानींच्या ‘या’ शेअर्सला पुन्हा फटका | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स घसरला, अदानींच्या 'या' शेअर्सला पुन्हा फटका

Stock Market Opening : शेअर बाजाराची सुरुवात आज गुरुवारी (दि.२) घसरणीने झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २५० अंकांनी खाली येऊन ५९,१५५ वर होता. तर निफ्टी १७,४०० च्या जवळ होता. अदानी एंटरप्रायजेसचा शेअर ५ टक्क्यांपर्यंत घसरला. तर बजाज फिनसर्व्ह ३ टक्क्यांनी वाढला.

बजाज फायनान्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी, कोटक बँक, इंडसइंड बँक हे शेअर्स हिरव्या चिन्हात खुले झाले आहेत. येस बँक, व्होडाफोन आयडिया, आयडीएफसी फर्स्ट बँक, वेदांता हे शेअर्स ‍वधारले आहेत. पंजाब नॅशनल बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले आहेत.

अदानी एंटरप्रायजेस, एसीसी हे शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button