एलआयसीची गुंतवणूक अदानी समूहासह ३६ कंपन्यांत; शेअरचे मूल्यांकन निम्म्यावर | पुढारी

एलआयसीची गुंतवणूक अदानी समूहासह ३६ कंपन्यांत; शेअरचे मूल्यांकन निम्म्यावर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने अदानी समूहासोबत अन्य 36 कंपन्यांत गुतंवणूक केली असल्याचे समोर आले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर सातत्याने घसरत आहे. त्यामुळे एलआयसीलाही फटका बसत आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात दोन्ही कंपन्यांची बैठक होणार आहे.

एलआयसी ही भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. अदानी समूहाचे शेअर घसरल्यानंतर एलआयसीला फटका बसला. त्यामुळे एलआयसीच्या शेअरचे मुल्यांकन निम्पावर आले आहे. केवळ अदानी कंपनीच्या नुकसानीमुळे एलआयसीला तोटा होत आहे असे नाही.

अशा एकूण 36 कंपन्या आहेत. ज्यामध्ये एलआयसीने गुंतवणूक केली आहे. त्यातूनही एलआयसी विमा कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. 6 कंपन्यांत एलआयसीने गुंतवणूक केली आहे, त्यांच्या शेअरची किंमत सहा महिन्यांत 20 टक्क्यांहून अधिक घसरली आहे.

तर अदानींचा कारखान्यावर कारवाई

हिमाचल प्रदेशातील सिमेंट कंपनीवा वाद वाढतच आहे. हिमाचल प्रदेशातील बंद सिमेंट अदानी समूहाने न सुरू केल्यास सरकार लवकरच कायदेशीर कारवाई करेल. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. कंपनीच्याविरोधात कारवाई करण्यासाठी कोणतेही चालढकल केली जाणार नाही. मात्र चर्चेतून मार्ग निघावा, असा आमचा हेतू असल्याचे उद्योगमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी सांगितले. सरकारने घातलेल्या अटीवर अदानी समूहाने बंद कारखाना सुरू करावा, असेही चौहान यांनी नमूद केले आहे.

अल्पकालावधीचा विचार करू नये

एलआयसीच्या गुंतवणुकीचा या अल्पकालावधीचा विचार केला जाऊ नये. कारण एलआयसी दीर्घकाळीन गुंतवणूकदार आहे. एलआयसी गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक नामांकित कंपन्यांतमध्ये पैसा गुंतवणूक करीत आहे, असे काही स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा :

Back to top button