वीज आणि गॅस दरवाढी विरोधात मविआ आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

वीज आणि गॅस दरवाढी विरोधात मविआ आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही, पिकावाचून मरतोय शेतकरी, सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे… पिकाला नाही पाणी, मालाला नाही भाव, अरे सरकार कधीतरी बळीराजाला पाव… महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आजही (दि.१) शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. 'चोर मचाये शोर' अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्‍या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news