

पुढारी ऑनलाईन डेस्क: 'श्रीमान पोपटलाल!', असे म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजप नेते किरिट सोमय्या यांचे नाव न घेता (Sanjay Raut Tweet) त्यांना डिवचले आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत किरिट सोमय्या यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. वाचा संजय राऊत काय म्हणाले…
खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर "तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा आये गा." अस कॅप्शन लिहिलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी रिट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, समझने वाले को इशारा काफी हैं! ईडीची कुऱ्हाड तुमच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. श्रीमान पोपटलाल! मार्क माय वर्डस (Mark my words).
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये नेमकं कोणाला श्रीमान पोपटलाल! म्हटले आहे याचा उल्लेख केला नसला तरी हा रोख भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आहे, अशी चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तूळात रंगली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या संमिश्र कमेंट येत आहेत.
हेही वाचा