Stock Market opening | जागतिक सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स तेजीत | पुढारी

Stock Market opening | जागतिक सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स तेजीत

Stock Market opening : जागतिक सकारात्मक संकेतांच्या जोरावर आज शुक्रवारी (दि. २४) सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ५९,८०० वर होता. तर निफ्टी १७,५०० वर होता. आजच्या व्यवहारात रिलायन्स, बँकिंग आणि आयटी स्टॉक्सनी आघाडी घेतली.

सेन्सेक्सवर भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स ०.५ ते १ टक्क्यापर्यंत वाढले आहेत. तर अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा हेदेखील वाढले आहेत.

दरम्यान, एल अँड टी, टायटन, आयटीसी, मारुती आणि एचडीएफसी हे शेअर्स घसरले होते. निफ्टी PSU बँक ०.८९ टक्के आणि निफ्टी आयटी ०.७१ टक्क्याने वाढला. फायनान्सियल सर्व्हिसेस आणि निफ्टी आयटी हेदेखील वाढून व्यवहार करत आहेत. (Stock Market opening)

हे ही वाचा :

Back to top button