Stock Market Closing | शेअर बाजारात चढ-उतार, ‘हे’ आहेत टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स | पुढारी

Stock Market Closing | शेअर बाजारात चढ-उतार, 'हे' आहेत टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स

Stock Market Closing : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अल्प प्रमाणात व्याजदरवाढीचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर संमिश्र संकेत आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि.२३) भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने स्थिर पातळीवर सुरुवात केली होती. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टीत चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर सुरुवातीचे नुकसान भरून काढत दोन्ही निर्देशांकांनी तेजीच्या दिशेने चाल केली. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वाढून ५९,८६० वर होता. तर निफ्टी १७,५८८ वर होता. त्यानंतर सेन्सेक्स १३९ अंकांच्या घसरणीसह ५९,६०५ वर बंद झाला. तर निफ्टी ४३ अंकांनी खाली येऊन १७,५११ वर स्थिरावला.

अदानींचे १० पैकी ८ शेअर्स रेड झोनमध्ये

अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव कायम असून त्यांचे १० पैकी ८ शेअर्स रेड झोनमध्ये गेले. अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर हे शेअर्स ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकले आहेत. केवळ अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट शेअरमध्ये वाढ दिसून आली.

‘हे’ टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एनटीपीसी, इंडसइंड बँक, टायटन आणि रिलायन्स या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर एचसीएल, टाटा स्टील, टीसीएस, एल अँड टी आणि विप्रो हे वाढले आहेत. निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.२७ टक्के आणि निफ्टी बँक ०.२१ टक्के खाली आला. निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटल वधारला. (Stock Market Opening) एनएसई निफ्टीवर आयटीसी, यूपीएल, कोल इंडिया, टीसीएस, टाटा स्टील आणि आयटीसी हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर एशियन पेंट्स, एचडीएफसी लाईफ, इंडसइंड बँक, टायटन, एचडीएफसी बँक हे घसरले होते.

काल बुधवारी सेन्सेक्स ९२७ अंकांनी घसरून ५९,७४४ वर बंद झाला होता. तर निफ्टी २७२ अंकांनी घसरून १७,५५४ पर्यंत खाली आला होता. यामुळे गुंतवणूकदारांचे चार दिवसांत ७ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

अमेरिका, आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल इस्टेट ०.३ टक्के खाली येऊन ३३,०४५ वर बंद झाला. तर नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक ०.१ टक्के वाढला. आशियाई शेअर बाजार गुरुवारी सात आठवड्यांच्या निचांकी पातळीवर आले. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ०.४ टक्के घसरला. शांघाय कंपोझिटदेखील खाली आला.

हे ही वाचा :

Back to top button