आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची आज पहिली बैठक

दीपक केसरकर
दीपक केसरकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण मिळाले. यानंतर आज (दि.२१) संध्याकाळी शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगतले.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला. आयोगाच्या या निर्णयाविरूद्ध ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाय राज्यातील सत्तासंघार्षावर आजपासून सलग तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची पहिली बैठक आज होणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news