Stock Market Today : भारतीय बाजाराची सुरुवात ‘लाल दिव्यांनी’; अदानी एंटरप्रायजेस 7 टक्क्यांनी घसरले, बजाज, इन्फोसिस, टीसीएसची चांगली कामगिरी | पुढारी

Stock Market Today : भारतीय बाजाराची सुरुवात 'लाल दिव्यांनी'; अदानी एंटरप्रायजेस 7 टक्क्यांनी घसरले, बजाज, इन्फोसिस, टीसीएसची चांगली कामगिरी

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज नकारात्मक लाल रंगात झाली. BSE सेन्सेक्स 39.34 पॉइंट्स किंवा 0.06% घसरून 60,624.45 वर आणि NSE निफ्टी 50 34.30 पॉइंट्स किंवा 0.19% घसरून 17,837.40 वर आला. बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी 17850 च्या खाली घसरला, सेन्सेक्स 120 अंकांनी घसरला; बँक निफ्टी 150 अंकांनी खाली, अदानी Ent चे शेअर 7% टक्क्यांनी घसरले.

काल बुधवारी दिवसभर बाजार उच्च पातळीवर काम करत असताना आज गुरुवारी मात्र, देशांतर्गत इक्विटी निर्देशांक लाल रंगात उघडले. BSE सेन्सेक्स 39.34 पॉइंट्स किंवा 0.06% घसरून 60,624.45 वर आणि NSE निफ्टी 50 34.30 पॉइंट्स किंवा 0.19% घसरून 17,837.40 वर आला.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, टीसीएस आणि पॉवर ग्रिड हे सर्वाधिक वाढले तर मारुती, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा तोटा झाला.

गेल्या काही दिवसांपासून वधारलेल्या अदानी समूहाचे शेअर्सही घसरले

अदानी समूहातील, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स हे गेल्या काही दिवसांपासून बाजारात चांगली कामगिरी करत असताना आज सकाळी मात्र अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग घसरले. तर अदानी वीलमर काही पॉइंट्सनी वधारले.

पे टीएमच्या शेअर्सची घसरण

बुधवारी टॉप फॉर्ममध्ये असलेल्या पे टीएमच्या शेअर्सनी आज सकाळी नकारात्मक सुरुवात केली.

Back to top button