भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत : चंद्रशेखर बावनकुळे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच केले जाईल. कुणालाही भाजपमध्ये यायचं असेल, तर त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असे स्पष्ट करत अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांना भाजपकडून कोणतीही ऑफर दिलेली नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे बाळासाहेबांना थोरांत यांना राजीनामा द्यावा लागणे, ही गंभीर बाब आहे. थोरातांसारखा ज्येष्ठ नेता नाराज होणे पक्षासाठी चांगले नाही. थोरातांचे पक्षासाठी खूप मोठे काम आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षात कोण नाराज असेल, तर अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज असते. परंतु, याकडे काँग्रेसमध्ये दुर्लक्ष होत आहे.”

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेला, इतर पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे अनेकांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांना भाजपकडून कुठलीही ऑफर देण्यात आलेली नाही. परंतु पक्षाचे दरवाजे तांबे यांच्यासाठी कायम खुले असतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button