Union Budget 2023 : व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य – चंद्रकांत पाटील | पुढारी

Union Budget 2023 : व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य - चंद्रकांत पाटील

पुढारी वृत्तसेवा; मुंबई : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सीतारमण यांचे या बजेटसाठी आभार मानले आहेत. व्यवसायाभिमुख शिक्षणाला प्राधान्य देणं आज काळाची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही यावर भर देण्यात आला आहे. बजेट सेशन २०२३ मध्येही त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं आहे, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (Union Budget 2023)

चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पातील काही मुद्दयांवर लक्ष केंद्रित करत म्हणाले की, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४. ० लवकरच येणार, यासोबतच नोकरीस उपयुक्त प्रशिक्षण तसेच व्यावसायिक भागीदारी सोबत नव्या व्यावसायिक गरजेनुसार तरुणांच्या कौशल्य विकासावर भर देण्यात येणार आहे. कौशल्य विकासासाठी देशभरात ३३ स्किल डेव्हल्पमेंन्ट सेंटर्स होणार.

Union Budget 2023 :  नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या निर्णयाचे स्वागत

पुढे बोलत असताना चंद्रकांत पाटील असेही म्हणाले की,“वाचनाचं महत्त्व लक्षात घेऊन; त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण आजच्या बजेटमध्ये डिजिटल पुस्तकालयाची स्थापना करण्याचा मुद्दा मांडला आहे. ३ वर्षात केंद्र सरकार करणार एकलव्य मॉडेल निवासी शाळा साठी ३८८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या शाळांतील ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालयाची स्थापना होणार आहे. विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या प्रशिक्षणासाठी उत्तम संस्था उभारणार असल्याचे या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील पुढे बोलत असताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. 

हेही वाचा

Back to top button