निवडणूक आयोगातील शिंदे गटाच्या लेखी उत्तरावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, हे त्यांचे वैफल्य... | पुढारी

निवडणूक आयोगातील शिंदे गटाच्या लेखी उत्तरावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, हे त्यांचे वैफल्य...

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजय राऊत यांच्या धमक्यांमुळे परराज्यात जावं लागलं असा मोठा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगात सादर केलेल्या लेखी उत्तरात केला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या भाषणाचा उल्लेख केला जात आहे ते भाषण सूरत येथून गुवाहाटीला पोहचल्यावर केलेले भाषण आहे. शिंदे गट प्रत्येकवेळी भूमिका बदलतो. खोके मिळाल्यामुळे ते सोडून गेले. त्यांच हे वैफल्य आहे, निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायलयाच्या लढाईत ते हारणार आहेत.”

आज (दि ३१) माध्यमांशी खासदार राऊत यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ज्या भाषणाचा उल्लेख केला जात आहे ते भाषण काळजीपू्र्वक बघा. सूरत येथून गुवाहाटीला पोहचल्यावर ते केलेले भाषण आहे. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायलयाच्या लढाईत शिंदे गट हारणार आहे, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, सध्या देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे. अर्थसंकल्प दरवर्षी सादर केला जातो, घोषणा केल्या जातात. पण काही उद्योगपतींना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडू नये. कामगार, मजूर, बेरोजगार न्यायाच्या अपेक्षेत आहेत. त्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प असेल तर स्वागत आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

Back to top button