राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात शत्रुत्व नाही : प्रकाश आंबेडकर | पुढारी

राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात शत्रुत्व नाही : प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण सर्व भारतीय आहोत, एकाच देशाचे नागरिक आहोत त्यामुळे आपआपसात शत्रुत्व असण्याचे काहीही कारण नाही. राजकीय विचारधारेत मतभेद असू शकतात. त्यामुळे भाजप सोबत टोकाचे मतभेद आहेत पण त्यांच्याशी शत्रुत्व नाही, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रकश आंबेडकर यांनी आज (दि.२७) पत्रकार परिषदेत मांडले. हुकुमशाही थांबवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व लोकशाहीवाद्यांनी एकत्र आले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आंबेडकर पुढे म्हणाले, सध्या एक विचारधारा धरून आम्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत जात आहोत. त्यामुळे पुनः एमआयएम सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मुळात आपण सर्व एकाच देशाचे नागरिक, मतदार आहोत त्यामुळे राजकीय वैर असण्याचे कारण नाही पण आपआपसात वैचारिक मतभेद असू शकतात, असे सांगून त्यांनी भाजप सोबत सुद्धा आपली युती होऊ शकते याला दुजोरा दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रकारे मनुस्मृतीचे दहन केले त्याप्रमाणे जर भाजपने मनुस्मृतीचे दहन केले आणि संविधानाच्या चौकटीत काम करू लागले तर त्यांचाही विचार होऊ शकतो, असे त्यांनी सूचित केले.

शरद पवार आजही भाजपसोबतच; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट

दरम्यान, एमआयएमची सोबत सोडण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, एमआयएमने १०० जागांचा अट्टहास धरला होता, जे आमच्यासाठी तांत्रिक आणि खर्चिक दृष्ट्या सोयीचे नव्हते. त्यावेळी मी ३५ ते ५० जागांसाठी बोलण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण एमआयएमने त्यांचा अट्टहास मागे घेतला नाही. त्यामुळे आम्हाला वेगळं व्हावं लागलं.

हे वचलंत का? 

Back to top button