आम्ही ठाकरेंसह काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार : प्रकाश आंबेडकर | पुढारी

आम्ही ठाकरेंसह काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार : प्रकाश आंबेडकर

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यावरून मोठं वक्तव्य केले आहे. “उद्धव ठाकरे यांना असं वाटतं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधील प्रश्न आहे. पण आम्ही त्यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जायला तयार आहे. जेव्हा शिवसेनेचा निकाल होईल त्या दिवशी ही घोषणा करून पुढे जाऊया” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागत

प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका मांडली असेल तर त्याचे स्वागत आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडी अजून मजबूत होईल. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या पाठींब्याचे स्वागत केले आहे. आजची लढाई संविधान आणि देश वाचविण्याची आहे. मतदारसंघांच्या बाबतीत वरिष्ठ निर्णय घेतील. पण महाविकासआघाडीचा उद्देश देशासमोरील धोका टाळण्याचा आहे. या उद्देशासाठी त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button