उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले : चंद्रशेखर बावनकुळे

जालना; पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली कामे शिंदे-फडणवीस सरकार करीत असल्याची जी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यात काहीच तथ्य नाही. विकासकामे करणे हे त्यांच्या रक्तातच नाही. ठाकरे फक्त सोन्याचा चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्याटीकेला प्रत्युत्तर दिले.

पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारे युनिट कार्यरत

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारे एक युनिट कार्यरत असून जनतेत ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून याबाबत आम्ही जनतेला कन्व्हेन्स करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले. शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे, हे प्रकरण घटनापीठाकडे असल्याचे ते म्हणाले.

Back to top button