मुंबई: सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन | पुढारी

मुंबई: सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे निधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांचे आज (दि.२५) दुपारी २ वाजून ९ मिनिटांनी राहत्या घरी निधन झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या. शारदामाई यांच्‍या निधनामुळे जीवनविद्या परिवारावर शोककळा पसरली आहे.

सद्गुरु श्री वामनराव पै यांच्यानंतर जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक कार्यक्रमात शारदामाई यांचा सक्रीय सहभाग व आशीर्वाद  लाभत असे. जीवनविद्या मिशनच्या प्रत्येक नामधारकाला त्यांचे मातृतुल्य प्रेम, मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्या निर्वाणाने जीवनविद्या मिशनमध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

शारदामाई यांच्‍या पश्चात मुलगा व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया निखिल पै, पणतू यश पै असा परिवार आहे.

हेही वाचा : 

Back to top button