Share Market Today | जागतिक संकेत नकारात्मक, सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, ऑटो वगळता सर्वच क्षेत्रांत विक्रीचा सपाटा | पुढारी

Share Market Today | जागतिक संकेत नकारात्मक, सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला, ऑटो वगळता सर्वच क्षेत्रांत विक्रीचा सपाटा

Share Market Today : जागतिक बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतांनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक लाल रंगात खुले. ऑटो शेअर्स वगळता सर्वच क्षेत्रांत विक्री दिसून येत आहे. भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी (दि. २५) घसरण दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी घसरून ६०,६७१ वर आला. तर निफ्टी १८ हजारांवर व्यवहार करत आहे. निफ्टीवर टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, सिप्ला, बजाज ऑटो आणि हिरो मोटोकॉर्प यांचे शेअर्स वधारले आहेत. तर अदानी एंटरप्रायझेस, एचसीएल टेक, अदानी पोर्ट, लार्सन अँड टुब्रो आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स घसरले.

अमेरिकेच्या शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक मंगळवारी संमिश्र व्यवहार करुन बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (DJIA) १०४ अंकांनी वाढून ३३,७३३ वर स्थिरावला. तर S&P 500 निर्देशांक ०.०७ टक्के घसरून ४,०१६ वर आणि नॅस्डॅक ०.२७ टक्के घसरून ११,३३४ वर बंद झाला.

आशियात संमिश्र व्यवहार

आशिया-पॅसिफिकमधील शेअर बाजारांनी बुधवारी संमिश्र सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक १.३ टक्के वाढला, तर कोस्डॅक सुरुवातीच्या पहिल्या तासातच १.१६ टक्के वाढून वर गेला. जपानचा निक्केई ०.२२ टक्के आणि टॉपिक्स ०.०६ टक्क्यांनी घसरला. चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजार सुट्टीमुळे बंद होते. (Share Market Today)

दरम्यान, काल मंगळवारी शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला होता. एकूण बाजारातील स्थिती अस्थिर दिसून येत आहे.

हे ही वाचा :

Back to top button