Gold price | सोन्याने ओलांडला ५७ हजारांचा विक्रमी टप्पा, दरवाढीमागे काय कारण?

Gold price : आंतरराष्ट्रीय दरांचा मागोवा घेत आज मंगळवारी (दि.२४) भारतातील सोन्याच्या दराने नवीन उच्चांक गाठला. आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५७,३६२ रुपयांवर पोहोचला. काल सोमवारी सोन्याचा दर ५७,०४४ रुपयांवर बंद झाला होता. आज मंगळवारी हा दर ३१८ रुपयांनी वाढला. तर चांदीचा दर प्रति किलो ६८,००६ रुपयांवर खुला झाला आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेट सोने ५७,३६२ रुपये, २३ कॅरेट ५७,१३२ रुपये, २२ कॅरेट ५२,५४४ रुपये, १८ कॅरेट ४३,०२२ रुपये, १४ कॅरेट सोन्याचा दर ३३,५५७ रुपयांवर खुला झाला.
अमेरिकेन डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. देशांतर्गत फ्यूचर्स मार्केटमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ०.४४ टक्के वाढून ५७,०९९ रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या दरात २०२३ वर्षात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोने का महागले?
MCX वर सोन्याचा दर ०.४ टक्के वाढून प्रति १० ग्रॅम ५७,०९९ रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर ०.५ टक्के वाढून प्रति किलो ६८,३०१ रुपयांवर वर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर ०.२ टक्के वाढून प्रति औंस १,९३५ डॉलरवर आहे. अमेरिका, युरोपवर सध्या मंदीचे सावट आहे. या अनिश्चित काळात गुंतवणूकदार सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळले आहे. त्यामुळे सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असे सराफा बाजरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डॉलर कमकुवत, गुंतणूकदारांचा सोन्याकडे कल
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कमी वाढ होण्याच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात सलग पाचव्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी राहिली आहे. आज सोन्याच्या किमतीने भारतातील नवीन विक्रमी उच्चांक गाठला. डॉलर निर्देशांक ०.२ टक्क्याने घसरला आहे. डॉलर कमकुवत झाल्याने गुंतणूकदारांना सोने खरेदी परवडणारी ठरते.
शुद्ध सोने असे ओळखा?
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते. (Gold prices)
#Gold and #Silver Opening #Rates for 24/01/2023 #IBJA #bullionworld #bvclogistics #unilightinsurance #maxsell #ankitst #bullion #jewellers #jewellery #retail #wholesale #manufacturer #sarafa #buyer #Seller #gems #magazine #logistics #insurance #machinery #kharaasona pic.twitter.com/KhXoXtXLLU
— IBJA (@IBJA1919) January 24, 2023
हे ही वाचा :