मुंबई; पुढारी ऑनलाईन : maharashtra health department exam : आरोग्य विभागाच्या 6 हजार 205 पदांसाठी होणारी व पुढे ढकलण्यात आलेली परीक्षांच्या तारखा पुन्हा जाहीर करण्यात आल्या आहेत. २४ ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी ३१ ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड देण्यात यावा, तसेच परीक्षा केंद्रांची तसेच शाळांची माहिती १ ऑक्टोबरपर्यंत द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ९ दिवस आधी हॉल तिकिट दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
maharashtra health department exam ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्याने उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. आरोग्य विभागाच्या गट- क आणि ड संवर्गातील 6 हजार 205 पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती.
राज्यातील 1500 केंद्रांवर एकाच वेळी परिक्षा होणार होती. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमध्ये अक्षम्य चुका होत्या. काही विद्यार्थ्यांचे ओळखपत्रच डाऊनलोड होत नसल्याने त्यांना ई-मेलवर नाव आणि परीक्षा केंद्र व बैठक क्रमांक पाठवण्यात आले. या ई-मेलवरही अनेक चुकीचे केंद्र देण्यात आले.
न्यासा या खासगी व बाह्य स्त्रोत असलेल्या आयटी कंपनीच्या गोंधळामुळे अखेर राज्य सरकारला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याबरोबरच मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली.
सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेल्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाने परीक्षा घेण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात न्यासासह काही कंपन्यांची निवड केली. न्यासा कंपनी आरोग्य विभागाने निवडलेली नाही. या परीक्षेसंदर्भात आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका तयार करणे इतकीच जबाबदारी होती, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचलं का?
[toggle title="" state="open"][visual_portfolio id="40771"][/toggle]