Jammu Blast : जम्मूमध्ये 24 तासात तीन स्फोट! सुरक्षा यंत्रणा अलर्ट | पुढारी

Jammu Blast : जम्मूमध्ये 24 तासात तीन स्फोट! सुरक्षा यंत्रणा अलर्ट

पुढारी ऑनलाइन डेस्क : जम्मूमध्ये गेल्या 24 तासात तीन स्फोट झाले आहे. जम्मूच्या बजलता येथे शनिवारी मध्यरात्री ट्रकच्या डंपरच्या युरियाच्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत एक पोलीस हवालदार जखमी झाला. सिध्रा येथील बजलता मोर येथे हा स्फोट झाला असून यात एक पोलिस हवालदार जखमी झाला आहे. सुरिंदर सिंग असे या स्फोटात जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग हे सिध्रा चौकात ड्युटीवर होते. यावेळी वाळू वाहतू करणा-या डंपर ट्रकची तपासणी करण्यासाठी थांबवण्यात आला. ट्रक थांबल्यावर डंपर ट्रकच्या युरिया टाकीचा स्फोट झाला. या पोलीस कर्मचारी किरकोळ भाजले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जम्मू रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या नरवाल येथे शनिवारी सकाळी झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत सात जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत असून जम्मूत येणार्‍या व बाहेर जाणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांनी आता जम्मू विभागाला टार्गेट केल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली.

जम्मू रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेल्या नरवाल येथील औद्योगिक वसाहतीत शनिवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी गर्दीच्या वेळी एका पाठोपाठ एक दोन स्फोट झाले. या स्फोटांमुळे तेथे एकच घबराट पसरली. या दोन्ही स्फोटांत सात जण जखमी झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला. तसेच एसआयएच्या टीमने स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू केला.

शनिवारी मध्यरात्री झालेल्या डंपरच्या टाकीचा स्फोट हा अपघात नसल्याचे पोलिस तपासणीत समोर आले आहे. याप्रकरणी नागरोटा पोलिस ठाण्यात स्फोटक कायद्याच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तींनी केलेला स्फोट म्हणून त्याचे वर्गीकरण केले आहे. दरम्यान, पोलिसांनी स्फोटा मागे दहशतवादी दृष्टीकोन असण्याची शक्यता नाकारली नाही.

हे ही वाचा :

 २६ जानेवारीपासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

Team India All Out Record : टीम इंडियाचा नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडचा ऑलआऊट करताच…

Back to top button