Supriya Sule vs Chitra Wagh : पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर, पक्षाची काळजी घ्या; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना पलटवार | पुढारी

Supriya Sule vs Chitra Wagh : पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर, पक्षाची काळजी घ्या; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : “अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आली आहे. बाकी मा. नरेंद्र मोदीजी यांची काळजी घेण्यास 130 कोटी भारतीय सक्षम आहेत. भाजप हे एक कुटुंब असल्याने कोणत्याही कामापूर्वी, कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली भारतीय संस्कृती!” असं खोचक ट्विट करत भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना डिवचलं आहे. (Supriya Sule vs Chitra Wagh)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१९) मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन केले. तसेच मेट्रो २ अ, मेट्रो ७ आणि २० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजीटल पद्धतीने भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी वाटते

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासंबंधी विचारलं असता त्या म्हणाल्या, सरपंचपदाच्या निवडणुकीपासून ते देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धावपळ करावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी वाटते. ते पक्षासाठी खूप कष्ट घेतात. त्या पुढे असेही म्हणाल्या होत्या की, प्रत्येक निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपकडे दुसरा पर्याय नाही. असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. 

Supriya Sule vs Chitra Wagh : पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर खोचक ट्विट करत प्रत्यूत्तर  दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुप्रिया सुळे यांना टॅग करत म्हंटलं आहे की,अहो सुप्रिया सुळे ताई तुम्ही आपल्या पक्षाची काळजी घ्या! पक्षातील खदखद पार चव्हाट्यावर आलीये बाकी मा. नरेंद्र मोदीजी यांची काळजी घेण्यास 130 कोटी भारतीय सक्षम आहेत. भाजप हे एक कुटुंब असल्याने कोणत्याही कामापूर्वी, कुटुंबातील वरिष्ठांचा आशीर्वाद घेणे ही आपली भारतीय संस्कृती!”

आता चित्रा वाघ यांच्या पलटवारला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार याची चर्चा राजकीय वर्तूळात होऊ लागली आहे.

हेही वाचा

Back to top button