मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं : संजय राऊतांची टीका | पुढारी

मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं : संजय राऊतांची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : दावोसमध्‍ये होणार्‍या करारांबाबत आम्हाला माहिती आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रकल्प नाकासमोरून गुजरात आणि इतर राज्यांनी पळवून नेले ते घेऊन आलात तर दावोसला जाण्यात अर्थ आहे. अन्यथा दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दावोस दौऱ्यावर केली.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “अनेक प्रकल्प राज्यातून पळवून नेले आहेत. मुख्यंत्री दोन-तीन दिवसांत दावोस दौऱ्यावरून मुंबईतून चोरून नेलेले प्रकल्प परत आणणार आहेत का? नाकासमोरून उद्योग पळवून नेले त्याचं काय? त्यांनी दावोसला जाण्यापेक्षा गुजरातला जावं.”

 मुंबईतले बहुतेक प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातील आहेत. आधीच झालेल्या प्रकल्पांच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला डाग लावण्याचं काम सुरू असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button