Anushka Sharma : विक्रीकर विभागाविरोधात अनुष्काची उच्‍च न्‍यायालयात याचिका | पुढारी

Anushka Sharma : विक्रीकर विभागाविरोधात अनुष्काची उच्‍च न्‍यायालयात याचिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिला विक्रीकर विभागाने नोटीस बजावली होती. याविरोधात तिने मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली आहे. विक्रीकर विभागाने २०१२-२०१३ आणि २०१३-२०१४ या वर्षातील कर वसुलीसाठी अनुष्काला नोटीस पाठवली होती. मीडिया रिपोर्टनुसार, अनुष्का शर्माने मागील महिन्यात आपल्या टॅक्स कंसल्टेंटच्या मदतीने दोन याचिका दाखल केल्या आहेत. (Anushka Sharma)

अनुष्काच्या याचिकेनंतर उच्‍च न्‍यायालयाने प्रतिवादीला नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाने विक्रीकर विभागाला ३ आठवड्याच्या आत याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : 

Back to top button